THE HIMALAYAN TALK: PALASH BISWAS TALKS AGAINST CASTEIST HEGEMONY IN SOUTH ASIA

THE HIMALAYAN TALK: PALASH BISWAS TALKS AGAINST CASTEIST HEGEMONY IN SOUTH ASIA INDIA AGAINST ITS OWN INDIGENOUS PEOPLES

PalahBiswas On Unique Identity No1.mpg

Thursday, March 31, 2011

Fwd: [initiative-india] Fwd: [NAPMConveners] Fwd: चलो मुंबई - धडक मोर्चा - 5 एप्रिल 2011



---------- Forwarded message ----------
From: napm india <napmindia@gmail.com>
Date: 2011/3/31
Subject: [initiative-india] Fwd: [NAPMConveners] Fwd: चलो मुंबई - धडक मोर्चा - 5 एप्रिल 2011
To: initiativeindia Groups <initiative-india@googlegroups.com>



प्रिय साथी,
 
जिंदाबाद!
 
मुंबई व अन्य महानगरांतील गरीब श्रमिक व महाराष्ट्रभरातील विविध प्रकल्पग्रस्त यांचा विशाल मोर्चा 1 डिसेंबर 2010 ला नागपूरला विधानसभा अधिवेशनावर आपण नेला होता. तेथे मा. मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण यांच्याशी सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळातील संबंधित मंत्री व सचिवही उपस्थित होते. चर्चेअंती, आपण सर्व प्रश्न समजवून घेऊन त्यावर निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
 
या मोर्चाला 3 महिने पूर्ण झाले आहेत. दि. 23 मार्चला, भगतसिंह स्मृतिदिन व डॉ. राममनोहर लोहिया जयंतीचे औचित्य साधून शेकडो मुंबईकर व अन्य प्रकल्पग्रस्त मंत्रालयासमोरील म. गांधी पुतळ्यासमोर जमले व त्यांनी सरकारला इशारा दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांशी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली व या सर्व मुद्यांवर शासन काय विचार करीत आहे, याची चर्चा केली. या सर्व मुद्यांची तड लावण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेणे व काही बाबतीत अंमलबजावणीच्या दिशेने कालबद्ध पावले उचलणे आवश्यक आहे, हे आंदोलकांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना आग्रहपूर्वक सांगण्यात आले, व हजारोंच्या संख्येने आम्ही 5 एप्रिलला मंत्रालयावर येत आहोत, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी त्याला सहमती दर्शवत, 5 तारखेला निर्णायक चर्चेची तयारी दाखवली आहे.
 
5 एप्रिलला सकाळी 10 वाजता सर्वांनी ऑगस्ट क्रांति मैदान (सँडहर्स्ट रोड, ग्रांट रोड स्टेशननजिक) येथे जमायचे आहे व तेथून मोर्चाने आझाद मैदानात जायचे आहे. आझाद मैदानात धरणे धरायचे आहे व सर्व मुद्यांची तड लावल्याशिवाय माघारी फिरायचे नाही.
 
सर्वांच्या सहभागाने आपण आपले प्रश्न सोडवण्यात यशस्वी ठरू याची खात्री आहे.
 
तेव्हा, सामील व्हा!
 
लडेंगे । जीतेंगे ।।
 
मेधा पाटकर, सुनीती सु.र., सिमप्रीत सिंह, विलास भोंगाडे, सुहास कोल्हेकर, जमिलाबहन, नसरीन बहन, आतिक शेख, निकेतन पालकर, ठुमाबाई वाल्हेकर, प्रसाद बागवे, अनिल शिंदे, रामलाल लोढा, नंदकिशोर तोष्णीवाल, मारुती भापकर, डॉ. सिद्धार्थ धेंडे, मानव कांबळे, उल्का महाजन व साथी....
 
सोबत याविषयीचा सविस्तर लेख व कार्यक्रमाची माहिती देणारे पत्रक जोडलेले आहे.
 


--
Suniti S.R.
National Alliance of People's Movements,
c/o 6,Raghav,Shri Raghuraj Society,
Sinhgad Road,Pune 411030
e mail - andolan.napm@gmail.com
Phone - 94235 71784, 020-24251404


--
National Alliance of People's Movements; National Office: Room No. 29-30, 1st floor, 'A' Wing, Haji Habib Bldg, Naigaon Cross Road, Dadar (E), Mumbai - 400 014;
Ph: 022-24150529
E-mail: napmindia@gmail.com | napm@napm-india.org

Delhi Contact : 09818905316

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "Initiative India" group.
To post to this group, send email to initiative-india@googlegroups.com.
To unsubscribe from this group, send email to initiative-india+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit this group at http://groups.google.com/group/initiative-india?hl=en.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...